उद्देश

वेबसाईट का बनवायची ?

मित्रांनो ,

यावर्षी म्हणजे 2026 मधे आपण आपली पाचवी गेट टुगेदर घेणार आहोत, पहिल्या गेट टुगेदर पासूनच आपण सर्वजण मौज, मस्ती सोबतच पे बॅक टु सोसायटी हे ध्येय ठरवून मार्गक्रमण करत आहोत. दरवर्षी आपण नवनवीन उपक्रम राबवत असतो.

आपल्या पूर्वजांनी सांगितल्या प्रमाणे, एका पिढीची चूक, दुसर्या पिढीची परंपरा, तिसर्या पिढीची संस्कृती आणि चौथ्या पिढीचा धर्म बनत असतो यावर गांभीर्याने विचार केल्यानंतरच आपण पहिल्या गेट टुगेदर पासूनच चांगल्या परंपरांचा अंगिकार करत आहोत. "जुनं ते सोनं" सोबतच "नवं ते हवं"हे धोरण आपण पाळत आहोत.

*पहिले स्नेहसंमेलन*
पवना धरण परिसरातील स्वर्ग रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडले. या वेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला तसेच स्थानिक संस्थेला मदतीचा हात देण्यात आला.

*दुसरे स्नेहसंमेलन*
नाशिक येथील रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आले. यावेळीही वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून निसर्ग संवर्धनाची परंपरा कायम ठेवण्यात आली.

*तिसरे स्नेहसंमेलन*
नारायणगाव येथे झाले. वृक्षारोपणासोबतच आर्वी येथील अवकाश दुर्बीण केंद्राला शैक्षणिक भेट देऊन विज्ञानाविषयी माहिती जाणून घेण्याची संधी सर्व मित्रांनी घेतली.

*चौथे स्नेहसंमेलन*
अहिल्या नगर येथे पार पडले. वृक्षारोपणासोबत अनामप्रेम संस्थेला आर.ओ. वॉटर फिल्टर भेट देण्यात आला. तसेच रांजणखळगे या नैसर्गिक वारसा स्थळाला भेट देऊन त्याविषयी माहिती जाणून घेण्यात आली.

*पाचवे स्नेहसंमेलन*
दिनांक १८ व १९ जुलै रोजी वेल्हे येथे आयोजित करण्यात आले आहे. यावर्षीही समाजसेवेचा वारसा जपत वेल्हे परिसरातील आदिवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकली तसेच शैक्षणिक साहित्य भेट देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शिक्षणाचा प्रवास अधिक सोपा व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, हीच या उपक्रमामागील भावना आहे.

आमचे स्नेहसंमेलन म्हणजे केवळ जुन्या मित्रांचा मेळावा नाही; तर मैत्री, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर उभा असलेला एक अर्थपूर्ण प्रवास आहे. ही परंपरा भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे.

माझ्या माहितीनुसार जीपीपी चे जे सर्व वेगवेगळया ब्रांच चे ग्रुप आहेत शिवाय कॉलेजचे जीपीपी अल्युमनी ही संघटना पण आहे या सर्वांमध्ये आपला हा ग्रुप जीपीपी 1987-1992 एक एक्टीव ग्रुप आहे जवळपास 250 ग्रुप मेंबर्स आहेत. या ग्रुपच्या मेंबर्सनी एका हाकेवर आपला मित्र यशवंत पाटील यांस जवळ जवळ पाच लाख रुपयाची मदत केली आहे याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे,सर्व सदस्यांचे अभिंनंदन करतो. अन्य दुसर्या ग्रुपच्या तुलनेत आपलं एक वैशिष्टय इथे आर्वजून अधोरेखीत करायला मला भाग पडत आहे ते म्हणजे आपण दरवर्षी सातत्याने गेट टुगेदर करत आहोत आणि आता ती एक चांगली परंपरा म्हणून रुजली आहे असं मानायला काहीच हरकत नसावी.

यावर्षी आपल्या जीपीपी 1987-1992 या व्हाटसअप ग्रुपवर आपण बघतच आहोत काही नवनवीन संकल्पना उदयास येत आहेत. एआय चा वापर आपण करत आहोत ऑफिस कामाशिवाय एआय आपल्या दैनंदिन जीवनात पाय पसरत आहे अशा वेळी आपणही काही आपली उपस्थिती इंटरनेट वर का नाही नोंदवायची? याच दृष्टीकोनातून आपण विचार करुन वेबसाईट बनवायचा निर्णय घेतला आहे.

या वेबसाईट मधे काय काय ठेवायचे. ते मी खाली स्पष्ट करत आहे.

1. आपली भूमिका, प्रस्तावना, मनोगत

2. कोअर कमेटी

3. सर्व मित्रांचा बायोडाटा (नोकरीपेशा, व्यवसायिक याची विस्तृत माहीती) जेणे करुन आपण एकमेकांचे सहाय्य घेऊ शकू.

4. मित्रांचा व्यक्त होण्यासाठी अभिव्यक्तीचे व्यासपीठ, नवीन काम आणि तंत्रज्ञानाची ओळखपाळख करणे.

5. मित्रांच्या कंपन्यांचे प्रोडक्ट च्या जाहीराती वेबसाईट वर झळकवणे, आपलं स्वतःचं प्रसिध्दी माध्यम तयार करणे

6. आपल्या लग्नाळू मुलामुलींचे योग्य ठिकाणी लग्न व्हावे हे प्रत्येक मातापित्याचे कर्तव्य आहे, मागे आपल्या व्हाटसअप ग्रुपवर आपल्या मेंबर्सनी आपल्या मुलांचे बायोडाटा शेअर केले त्यांना एका ठिकाणी प्रसिध्द करुन लग्न कार्यास हातभार लावणे या उद्देश्याने वेबसाईट वर एक पेज/पुस्तक ठेवले जाईल.

7. नवीन मेंबर्स साठी रजिस्ट्रेशन फॉर्म.

इत्यादि

*********************